Breaking News

‘राहुरी’च्या असहाय्य मातेला ‘नेवाशा’ची अनमोल मदत


राहुरी, पतीचे छत्रछाया हरपलेल्या आणि कुटूंबात तीन अंध मुलांच्या संगोपनाची समस्या असलेल्या येथील असहाय्य मातेला नेवासा शहर मुस्लिम समाजाच्यावतीने २७ हजार १०० रु. रोख रक्कम देऊन आर्थिक हातभार लावण्यात आला. याबद्दल राहुरीच्या अमन सोशल असोसिएशने कृतज्ञता व्यक्त केली आहे.
राहुरी फॅक्टरी येथील तीन अंध मुलांचे संगोपनची जबाबदारी असलेल्या मिनाज शेख या मातेची बातमी झळकली होती. पती सेंट्रिंगचे काम करीत होते. दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला. पहिला मुलगा शोएब, दुसरी मुलगी नाजीया, तिसरा मुलगा साजीद अशी तिन्ही मुले जन्मजात डोळ्याने अपंगत्व असल्याने हे कुटूंब हतबल झाले होते. या तिन्ही मुलावर वेळोवेळी डोळ्यांच्या दवाखान्यात दाखवूनही इलाज झाला नाही. संकटावर मात करीत ती माता या दिव्यांग मुलांचे पालन पोषण करीत असल्याची ती बातमी मागील महिन्यात वर्तमानपत्रात छापून आली होती. ती बातमी वाचून नेवासा येथील मुस्लिम समाज बांधवांनी या मातेला आर्थिक हातभार लावायचा निर्धार केला. त्यानुसार या मातेला ही आर्थिक मदत देण्यात आली. यावेळी अब्दुल रहेमान पिंजारी, हाजी जुम्माखान पठाण, जब्बार महेबूब शेख, शफी अल्लाबक्ष शेख, राहुरीच्या अमन सोशलचे अध्यक्ष भय्या शेख, सेक्रेटरी बादशहा शेख, अब्दुल रज्जाक शेख, समीर शेख, अफजल पठाण, अजमखान पठान, अकिल शेख, जीलानी बेग, जेनुद्दीन शेख आदी उपस्थित होते.