Breaking News

राहुरी फॅक्टरी येथे घराला भीषण आग


राहुरी फॅक्टरी परिसरात रविवारी { दि. २३} अचानक आग लागल्याची घटना घडली. या आगीत संसारोपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झाले. सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास येथील आदिनाथ वसाहत परिसरात ही दुर्दैवी घटना घडली. 
राहुरी फॅक्टरी आदिनाथ वसाहत परिसरात रविवारी सायंकाळी अचानक आकाशाच्या दिशेने आगीचे व धुराचे लोटच्या लोट दिसून आले. अशातच फटाक्यांप्रमाणे आवाज येऊ लागला लागला. येथील अनिल दिगंबर गोलांडे {वय ४८} यांच्या तीन रुम आणि एक किचन असलेल्या राहात्या घराला आग लागली. अचानक लागलेली ही आग आटोक्यात आणण्यासाठी परिसरातील तरुणांनी पुढाकार घेतला. देवळाली व राहुरी नगरपालिकेची अग्निशामक दलाला मोबाईलवरून याची माहिती कळताच या दलाचे कारभारी घटनास्थळी दाखल झाले. दीड ते दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात या दलाला यश आले. 

या आगीत एक कपाट, दोन शोकेज, एल ए डी टिव्ही, इन्व्हर्टर, बॅटरी, संपूर्ण इलेक्ट्रिकल वायरींग, फॅन, खिडक्या, दरवाजे जळून खाक झाले. सुमारे दीड ते दोन लाखांच्या आसपास नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. घरातील गॅस सिलेंडरपर्यंत आग गेली. मात्र ते असल्याने पुढील अनर्थ टळला. दरम्यान, घटनास्थळी नगराध्यक्ष सत्यजित कदम, चैतन्य उद्योग समुहाचे गणेश भांड, दिपक त्रिभुवन, सुरेश लोखंडे, इंजिनिअरिंग काॅलेज विद्यार्थी, सोमनाथ चव्हाण, बापू साळुंके, रुपेश गोलांडे त्यांचा परिवार व इतर सामाजिक कार्यकर्ते आदींनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले.