Breaking News

पोलिसांनी कत्तलखान्यावर केली जंबो कारवाई! ३ लाख ८७ हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त


राहुरी वि. प्रतिनिधी - शहरातील खाटीक गल्ली येथील कत्तलखान्यावर आज {दि.२३ } पहाटे श्रीरामपूर विभागाचे पोलिस उपधिक्षक सोमनाथ वाघचौरे आणि राहुरीचे पोलिस निरिक्षक प्रमोद वाघ यांनी छापा टाकला. या कारवाईत देशी गायीची कत्तल करणार्या दोघांना गजाआड करुन त्यांच्या ताब्यातील २७ गायी, वासरे पोलिसांनी ताब्यात घेतली. या कारवाईत ३ लाख ८७ हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी राहुरी पोलिस ठाण्यात प्राणी संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. 

राहुरी येथे प्रथमच ही कारवाई करण्यात आली. या कत्तलखान्यालगत असलेल्या मोकळ्या जागेत बांधलेली गायी आणि वासरे पोलिसांनी ताब्यात घेतले. शहरातील फरार आरोपींचा शोध घेत असतांना कानिफनाथ चौक येथे पिकअप {क्र. एम. एच. १३ ए. एन. } ही पांढरया रंगाची जीप संशयास्पद थांबलेली दिसली. वाहनचालकास गाडीत काय आहे, अशी विचारणा केली असता चालकाने गाडीत प्लास्टिक असल्याचे खोटे सांगितले. पोलिसांनी वाहन चेक केले असता या वाहनातील ड्रमच्या खाली एक गाय निर्दयतेने बांधून ठेवण्यात आल्याचे आढळून आले. पोलिसांनी कसून चौकशी केली असता खरा प्रकार समोर आला. 

याप्रकरणी पोलिसांनी वाहन चालक व त्याच्या बरोबर असलेले मुक्तार मुस्ताक कुरेशी {वय- २८ वर्षे}, मुन्नावर फकीर सय्यद { वय ३२ वर्षे, {दोघे रा. खाटीकगल्ली, राहुरी} दोघांना अटक केली. पोलिसांनी विचारले असता त्यांनी ही जनावरे कत्तलखान्यात चालविली असल्याचे सांगितले. यामधे पोलिसांनी ८बैल १९ लहान मोठे जणावरे, यामधे ६ जनावरे, २ महिने वयाची १३ जनावरे, ३ ते दिड वर्षे वयाची सुमारे २७ जनावरे असा १ लाख ३७ हजारची लहान मोठे जनावरे, २ लाख ५० हजार रुपये किंमतीचे चार चाकी वाहन पिकअप असा सुमारे ३ लाख ८७ हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. राहुरीतील कत्तलखान्यावर प्रथमच पोलिसांनी जंबो कारवाई करण्यात येऊन तब्बल २७ जनावरांची सुटका करण्यात आली. नागरिकांमधून या कारवाईबद्दल पोलिस प्रशासनाचे कौतुक होत आहे. घटनेचा तपास पोलिस निरिक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्दर्शनाखाली स. फौ. दत्तात्रय जाधव करत आहेत.