कनोली येथे आंबेडकर जयंती साजरी करताना झेंडा लावण्यावरुन वाद.
संगमनेर तालुक्यातील कनोली येथे १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करताना झेंडा लावण्यावरुन झालेल्या वादातून येथिल प्रतिभा सतीष जगताप (वय- २८) यांनी अनुसुचित जाती जमाती कलमा अंतर्गत तर सतीष चद्रंभान वर्पे (वय- ३०) यांनी मारहाण व चोरी केल्याची आश्वी पोलिस ठाण्यात तक्रांर दाखल केली असून दोन्ही गुन्ह्यातील ११ आरोपीना संगमनेरचे विभागीय पोलिस उपअधिक्षक अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली ताब्यात घेण्यात आले आहे.
प्रतिभा सतीष जगताप या महिलेने आश्वी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रांरीत म्हटले आहे की, १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करावयाची असल्यानी येथिल सर्कलवर निळा झेंडा लावण्यात आला होता. त्यामुळे संदीप वर्पे व सतीष वर्पे यांनी या ठिकाणी येत संदीप वर्पे यांने झेंडा काढला. यावेळी माझे पती सतीष जगताप यांनी जयंती असल्याने दोन दिवस झेंडा राहु देण्याची मागणी केली. परंतू झेंडा तुमच्या हद्दीत लावा असे म्हणत ज्ञानदेव वर्पे, प्रसाद वर्पे व विजय वर्पे यांना फोन करुन त्या ठिकाणी बोलवण्यात आले. यावेळी सतीष वर्पे व ज्ञानदेव वर्पे यानी जातीवाचक शिवीगाळ केली तर प्रसाद वर्पे यांने पती सतीष जगाताप याला मारहाण केली. याप्रसंगी भांडण सोडवण्यासाठी मधी गेल्यानतंर विजय वर्पे व ज्ञानदेव वर्पे यांनी मारहाण केल्यामुळे प्रतिभा जगताप यांच्या हाताला व पायाला दुखापत झाली होती.
याप्रसंगी गोरख जगताप, नाना जगताप, छाया जगताप यानी भांडण सोडवले व गावातील प्रतिष्ठित नागरीकानी मध्यस्थी केल्यामुळे गुन्हा दाखल केला नव्हता. परंतू १५ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास प्रसाद वर्पे, किरण वर्पे, अरुण वर्पे व प्रसाद वर्पे (रा. कनोली) यांनी दुसऱ्या बरोबर फोनवर बोलतानी धमकावण्याचा प्रयत्नं केला. त्यामुळे पती सतीष जगताप यांच्या जीवाला धोका निर्माण झाल्यामुळे आश्वी पोलिस ठाण्यात गुरव नं २४/२०१८ भादंवी कलम १४२, १४७, १४९, ३२३, ५०४, ५०६ व अनुसुचित जाती जमाती कलम ३(१), (४) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर सतीष चद्रंभान वर्पे यांनी आश्वी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रांरीत म्हटले आहे की, १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यासाठी मी, ज्ञानदेव वर्पे व उपसरपंच दत्तात्रंय वर्पे हे छंत्रपती शिवाजी महाराज सर्कल जवळ गेलो होतो. यावेळी सतीष जगताप याला वादग्रस्तं जागेवर झेंडा का लावला असे विचारल्या नतंर ऐकाने झेंडा काढून घेतला. त्यानतंर ज्ञानदेव वर्पे, बंडु वर्पे, शिवाजी जगताप, डँनियल जगताप, मनोहर पारखे, दत्तु वर्पे, पोपट वर्पे आदिसह हवालदार बर्वे यानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली.
सकाळी १० वाजेच्या सुमारास मी कनोली - कणकापूर रस्त्याने जात असताना गोरख जगताप, सतीष जगताप, नाना जगताप, विजय जगताप, बंडु जगताप, डँनियल जगताप (रा. कनोली) यानी रस्त्यात अडवून काठी व लाथ्था बुक्यानी मारहाण करत जवळील ५००० रु. तर नाना जगताप यांने आर्धा तोळ्याची चैन हिसकावून घेतली. यावेळी जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली होती. गावातील प्रतिष्ठित नागरीकानी मध्यस्थी केल्यामुळे गुन्हा दाखल केला नव्हता. परंतू सतीष जगताप यांने तक्रांर दिल्याने मी आश्वी पोलिस ठाण्यात गुरव नं २५/२०१८ भादंवी कलम ३९५ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
संगमनेरचे विभागीय पोलिस उपअधिक्षक अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली परस्पर विरोधी दोन्ही गुन्ह्यातील अँट्रॉसिटी अंतर्गत १) संदीप वर्पे (वय- २८), २) सतीष वर्पे (वय- ३८), ३) ज्ञानदेव वर्पे (वय- ४५), प्रसाद वर्पे (वय- २७) व विजय वर्पे (वय- ३२) तर कलम ३९५ अंतर्गत १) नानासाहेब जगताप (वय- ६५), २) गोरख जगताप (वय- ४८), डँनियल जगताप (वय- ५०), सतीष जगताप (वय- ३२), विजय जगताप (वय- ३६) व बंडु जगताप (वय- ४०) अशा एकून ११ आरोपीना ताब्यात घेतले असून न्यायालयात हजर केल्यानतंर आरोपीना ४ दिवसाची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. अशी माहिती पोलिस निरिक्षक अनिल कटके यांनी दिली आहे. तर कनोली गावामध्ये शांतता रखण्याचे पोलिसानकडून आवाहन करण्यात आले आहे.