Breaking News

सर्वोच्च न्यायालयाचे संकेतस्थळ दुसर्‍यांदा हॅक


नवी दिल्ली : ब्राजीलच्या हॅकर्सनंतर रात्री उशिरा बांग्लादेशी हॅकर्सनेही सर्वोच्च न्यायालयाचे संकेतस्थळ हॅक केले. देशाच्या इतिहासात पहिल्यांदा सर्वोच्च न्यायालयाचे संकेतस्थळ 24 तासात दोनदा हॅक केले गेले. गुरुवारी सकाळी साडे दहा वाजता न्यायमुर्ती लोया यांच्या मृत्यूच्या चौकशीची मागणी करणार्‍या याचिकेवर निकाल दिल्यानंतर काही वेळातच सर्वोच्च न्यायालयाचे संकेतस्थळ हॅक झाले. न्यायालयाच्या निर्णयानंतर अनेक लोक निकाल बघण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या संकेतस्थळाला भेट देत होते, मात्र त्यावर हे संकेतस्थळ ब्राझिलच्या हॅकर्स टीमने हॅक केल्याचा मजकुर दिसत होता.