Breaking News

नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयावर सोमवारी मोर्चा

शेवगांव: प्रतिनिधी - येथील पंंचायत समितीच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आशा कर्मचारी संघटना व ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाची बैठक नुकतीच पार पडली. नाशिक येथे सोमवारी {दि. १६ } विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. 

कामगारांना किमान वेतन मिळावे, शासकीय कर्मचारी दर्जा देण्यात यावा, शासकीय कर्मचाऱ्यांच्या सर्व सोयी उपलब्धता करून देण्यात याव्या आदींसह विविध प्रश्नांसंदर्भात मोर्चा काढण्यात येणार आहे. मोर्चाचे नियोजन करण्यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे तालुका सचिव कॉ. भगवान गायकवाड, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य कौन्सिल सदस्य कॉ. संजय नांगरे, ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ प्रमुख कॉ. संजय डमाळ, वैभव शिंदे, असलम सय्यद, कॉ. शम्मा आस्लम सय्यद, यमुना दौंड, राजुरकर, सातपुते, पोपळे, जर्राड, मुळे निशा जमधडे, झिरपे, पावशे, प्रमिला रोडगे, संतोष लहासे, एकनाथ वखरे आदींसह अन्य कर्मचारी यावेळी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. नाशिक येथे होणाऱ्या विभागीय आयुक्त कार्यालयावर नेण्यात येणाऱ्या या मोर्चात मोठय़ा संख्येने सहभागी होण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला.