Breaking News

आदिवासी जळित कुटुंबास आ. थोरात मित्रमंडळाची मदत

संगमनेर प्रतिनिधी - तालुक्यातील दरेवाडी येथील आदिवासी भिल्ल समाजाचे गोरक्ष पवार यांच्या घराला काही दिवसांपूर्वी आग लागली. यात त्यांची आयुष्यभराची कमाई आणि संसारोपयोगी साहित्य जळून नष्ट झाले. ही माहिती कळताच आ. बाळासाहेब थोरात मित्रमंडळ दिलासा मदत केंद्र (यशोधन) आणि आधार फाऊंडेशनच्यावतीने संसारोपयोगी साहित्य, किराणा, धान्य, अंथरण्यासाढी आणि पांघरण्यासाठीचे कपडे अशा अत्यावश्यक साहित्यांची मदत करण्यात आली.

याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकर खेमनर, विष्णूपंत रहाटळ, दशरथ वर्पे, आदिवासी सेवक प्रा. बाबा खरात, आधार फाऊंडेशनचे सुखदेव इल्हे, पी. डी. सोनवणे, प्रा. चं. का. देशमुख, बाळासाहेब उंबरकर, सुधीर जोशी, एस. एम. खेमनर आदींच्या हस्ते गोरक्ष पवार आणि सत्यभामा पवार यांना या साहित्यांचे वाटप करण्यात आले.

याप्रसंगी बोलतांना खेमनर म्हणाले, जळिताच्या या घटनेची माहिती कळताच आ. थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आदिवासी जनसेवक प्रा. बाबा खरात, दशरथ वर्पे, बाळासाहेब उंबरकर व आधार फाऊंडेशन यांच्यावतीने मदत करण्याचे ठरविले. यावेळी पी. डी. सोनवणे, एस. एम. खेमनर, सुखदेव इल्हे यांचीही भाषणे झाली. कार्यक्रमासाठी माजी सरपंच सखू केदार, विक्रम डहाळ, दिलीप आव्हाड, साहेबराव आव्हाड, शिवाजी कारंडे, योगेश पवार, साहेबराव फड, शंकर फड, किरण आव्हाड, संजय केदार, कोंडाजी आव्हाड, शिवाजी गायकवाड, नाना कारंडे, आनंदा घरगुडे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन अविनाश आव्हाड यांनी केले. जनार्दन मैड यांनी आभार मानले.