वाळू उपसावेळीशासकीय अटींचे उल्लंघन : शिंदे
शिर्डी/प्रतिनिधी - गोदावरीच्या वाळू साठ्याचे लिलाव जरी झाले असले तरी त्या वाळूची वाहतूक सकाळी ६ ते सायंकाळी ७ या काळात उत्खनन व वाहतूक करणे बंधनकारक आहे. मात्र असे असताना रात्रीच्या वेळीही मोठ्या प्रमाणावर राहाता आणि कोपरगाव तालुक्यात वाळूची वाहतूक केली जात आहे. यामुळे शासनाच्या शर्ती व अटींचे उल्लंघन होत आहे, असा राहाता तालुका शिवसेनेचे अध्यक्ष संजय यांनी केला आहे.
ते म्हणाले, की वाळू उपशासाठी जे. सी. बी. आणि पोकलेन यांची परवानगी नसताना होणारा वापर त्याबरोबरच ज्याठिकाणी गोदावरीच्या नदी पात्रता लिलाव झाले आहे, अशा ठिकाणी सी. सी. टी. व्ही. बसविणे लिलाव घेणाऱ्या धारकावर बंधनकारक आहे. मात्र या नियमाकडे दुर्लक्ष केले जात आहे. राहाता आणि कोपरगाव तालुक्याच्या गोदावरीचा लिलाव घेणाऱ्या ठेकेदाराकडून होत शासनाच्या अटी आणि शर्तींचा भंग होत असून याकडे महसूल विभाग का दुर्लक्ष करतो, असा सवाल शिंदे यांनी उपस्थित केला आहे. क्षमतेपेक्षा जास्त वाळू डंपरमध्ये भरून नेली जात असताना कोट्यावधी रुपये खर्च करून तयार केलेले रस्ते खराब होत आहेत.