राजेंद्र पवार यांचे नगरसेवकपद रद्द
श्रीरामपूर /शहर प्रतिनिधी - माजी नगरसेवक संजय छल्लारे यांनी न्यायालयात राजेंद्र पवार यांच्याविरोधात सादर केलेले दोन दावे प्रलंबित असताना पवार यांनी उमेदवारी अर्ज भरताना संबंधित रकाने निरंक ठेवले. तसेच रयत शिक्षण संस्थेत पवार नोकरीला असल्याच्या कारणावरून जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेल्या तक्रारची दखल घेत श्रीरामपूर पालिकेचे नगरसेवक राजेंद्र पवार यांचे नगरसेवकपद जिल्हाधिकऱ्यानी रद्द केले आहे. निकालाविरुद्ध औरंगाबाद खंडपीठात धाव घेणार असल्याचे पवार यांनी सांगितले.
राजेंद्र पवार यांनी काँग्रेसचे नगरसेवक संजय छल्लारे यांचा प्रभाग क्रमांक १२ मधून पराभव केला होता. त्यानंतर छल्लारे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पवार यांच्या विरोधात तक्रार केली होती. पवार यांचे पद रद्द झाल्यामुळे महाआघाडीला मोठा धक्का बसला आहे. याप्रसंगी संजय छल्लारे समर्थकांनी जिजामाता चौकात फाटके गोडाऊन निर्णयाचे स्वागत केले. छल्लारे आणि करण ससाणे यांनी त्यांनी आमच्याविरोधात जनतेतून निवडून येऊन दाखवावे, असे खुले आवाहन पवार यांनी यावेळी दिले.