Breaking News

भारतीय टपाल खात्यातही बँकेच्या सर्व सुविधा

नवी दिल्ली : भारतीय टपाल खाते आजपासून देशातील सर्वांत मोठी पेमेंट बँक बनण्यास तय्यार झाली आहे. इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या माध्यमातून ग्राहकांना अनेक सेवा मोफत दिल्या जातील. देशातील सर्व टपाल खात्यांमध्ये बँकिंग सेवा सुरू केली जाणार आहे.


देशात सध्या 1.55 लाख पोस्ट ऑफिस आहेत. व्यवहारासाठी 650 पेमेंट बँक त्यांना मदत करतील. एक लाख रूपयांपर्यंतचे बचत खाते, 25 हजार रूपयांवर 5.5 टक्के व्याज, चालू खाते आणि थर्ड पार्टी इन्शूरन्स अशा सुविधा मिळतील. तुमचा आधार नंबर हाच पेमेंट ऍडेस असेल. सेवा सुरू झाल्यानंतर आयपीपीबी देशातील सर्वात मोठे बँकिंग जाळे म्हणून समोर येईल. पोस्टमन आणि ग्रामीण टपाल सेवक शहरी आणि ग्रामीण भागात डिजिटल पेमेंट सेवा पोहोचवणार आहेत. 2015 मध्ये भारतीय टपाल खात्याला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पेमेंट बँक म्हणून काम करण्यासाठी मान्यता दिली होती.