महिला सुरक्षितता सबलीकरण जनजागृती व मोफत सॅनिटरी पॅड वाटप कार्यक्रम
प्रवरा ग्रामिण अभियांत्रिकी महाविद्यालय हे नेहमीच महाविदयालयातील विद्यार्थांच्या अष्टपैलु व्यक्तिमत्व विकासावर भर देत असते. त्यातीलच ऐक म्हणजे समाजसेवा. त्यानुसार प्रवरा अभियांत्रिकी महाविद्यालयातील निर्भया- एकपाऊल बदलाकडे यांच्या मिशन-१००००० यांच्या अंतर्गत पहिल्या टप्प्यातील सॅनिटरी पॅडचे वाटप दि. १० एप्रिल २०१८रोजी लोहारे येथे गावचे सरपंच सौ. रुपालीताई बाबासाहेबदुशिंगे प्रवरा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.यशवंतखर्डे, प्रा. संजय गलांडे, प्रा. सतीश शिरसाठ यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. प्रवरा अभियांत्रिकी महाविद्यालयातील निर्भया- एक पाऊल बदलाकडे या विद्यार्थ्यांच्या गटाने हाती घेतलेल्या मिशन-१००००० या अंतर्गत ग्रामीण भागातील एक लाख मुलींना सॅनिटरी पॅडचे मोफत वाटप करण्याचा ध्यास घेतला आहे.
निर्भया हा गट मागील दोन वर्षांपासून महिला सबलीकरण आणि सक्षमीकरण यासाठी काम करत आहे. या आधीही या गटातील मयूर गायकवाड या विद्यार्थ्याला पिलर्स ऑफ नवभारत युथ अवॉर्ड महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. देवेंद्रफडणवीस व मानव संसाधन मंत्री मा. डॉ. सत्यपाल सिंग यांच्या उपस्थितीत आणि महिला व बालविकास मंत्री मा. विद्या ठाकूर यांच्या हस्ते देण्यात आलेला आहे. याकार्यक्रमांतर्गत प्रतिभा पाटील व मयूर गायकवाड यांनी महिलांना येणाऱ्या पाळी व ब्रेस्ट कॅन्सर बद्दल मोलाचे मार्गदर्शन केले. व लोकांमध्ये असलेल्या गैरसमजुतीबद्दलमाहिती दिली. त्याचबरोबर निर्भया ग्रुप मधील राहुल गोरडे, प्रज्ञा औटी, गणेश देवगिरी, ऋषिकेश शिरसाठ, योगेश गोरडे, प्रफुल्ला आहेर हया विदयाथ्यांनी मुलींमध्ये जनजागृतीसाठी प्रयत्न केले.