अत्याचारी नराधमांना भरचौकात फाशी देण्यात यावी
राहुरी ता. प्रतिनिधी - देशात वारंवार होत असलेल्या महिला अत्याचाराच्या घटनांमुळे प्रत्येकाला शरमेने मान खाली घालावी लागत आहे. भारतीय लोकशाहीत महिलाभगिनी असुरक्षित आहेत. शासनाच्या भूमिकेमुळे आज स्त्रीयांवरिल अत्याचारात वाढ होते आहे. एकीकडे ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ असा नारा दिला जात आहे. तर दुसरीकडे अत्याचाराने महिलाभगिनीग्रस्त आहेत. त्यामुळे महिला आणि मुलींवर अत्याचार करणाऱ्या या नराधमांना भरचौकात फाशी देण्यात यावी, असा सूर राहुरी शहरात नुकत्याच काढल्या गेलेल्या ‘कँन्डल मार्च’मधून उमटला.
कठूआ, {जम्मू कश्मिर}, उन्नाव {उत्त्तर प्रदेश} आणि सुरत {गुजरात} येथील माणुसकीला काळिमा फासणा-या घटना समोर आल्याने देशाची मान जगभरात खाली गेली. याबाबत केंद्रात सत्तेवर असणारे सरकार याला जबाबदार असून अल्पवयीन मुलींचा अनन्वित चाल करून अत्याचार करत त्यांच्या देहाची विटंबना करणारे नराधम या देशात आहेत, ही मोठी शरमेची बाब आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी अनेकांनी व्यक्त केली.
राहुरी शहरात महिला अत्याचार घटनांच्या निषेधार्थ सर्वपक्षीय निषेध (कँन्डल ) मोर्चा काढण्यात आला. मौलाना आझाद चौक, शिवाजी चौकमार्गे हा मार्च शहराच्या पेठांमधून काढण्यात आला. कँडल मार्च शनिचौकातील संविधान स्तंभाजवळ आला असता झालेल्या निषेध कठूआ, सुरत, उन्नाव येथे माणुसकीला कलंक लावणारे प्रकार घडले. त्या पार्श्वभूमीवर हा मार्च काढण्यात आला होता.
याप्रसंगी राहुरीचे नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांनी या घटनेचा निषेध नोंदविला. विद्रोही चळवळीचे डॉ. जालिंदर घिगे यांनी भारतीय लोकशाहीची विटंबना करणारे सध्याचे सरकार असंवेदनशील असल्याचे सांगत आम्ही खरेच भारतीय लोकशाहीत आहोत की अन्य कुठे, असा सवाल केला. यावेळी पार पडलेल्या निषेध सभेत माजी उपनगराध्यक्ष आर. आर. तनपुरे, रिपाइंचे उत्तर जिल्हाध्यक्ष दिपक गायकवाड, पापा बिवाल, शालीनी पंडीत, संजय संसारे, बिलाल शेख, मुज्जू कादरी, इमरान सय्यद आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी छावा संघटनेचे देवेंद्र लांबे, संभाजी ब्रिगेडचे मच्छिंद्र गुंड, राजेंद्र खोजे डॉ. राहुल शेटे, ईमदाद पठाण, डॉ. जाकीर परवेज सय्यद, फहिम शेख, नगरसेविका अर्चना तनपुरे, ऋषिकेश तनपुरे, महेश वराळे आदी उपस्थित होते. निषेध मोर्चानंतर पोलिस उपनिरीक्षक लक्ष्मण भोसले यांना निवेदन देण्यात आले.