Breaking News

अखेर 40 वर्षानी त्या कुटुंबाला मिळाले हक्काचे घर.

राहुरी तालुका प्रतिनिधी - शहरातील रामकृष्ण मासारे ह्यांच्या कुटुंबातील 3 अपंग मुलाना नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे ह्यांनी घर बांधून देण्याचे मोठे पुण्याचे काम केल्याचे सांगून त्या कुटुंबा समवेत दोन्ही नेत्यांनी गृह प्रवेश केला व मासारे कुटुंबाच्या आनंद गगनात मावेनासा झाला.अखेर 40 वर्षानी मासारे कुटुंबाला मिळाले हक्काचे घर.

आमदार बच्चू कडु 3 वर्षापुर्वी राहुरी तालुक्याचे दौऱ्यावर आले असता अपंगांचे मेळाव्यात श्री कडु ह्यांनी तत्कालीन नगराध्यक्षा डॉ उषाताई तनपुरे व प्रसाद शुगरचे अध्यक्ष प्राजक्त तनपुरे ह्यांचे उपस्थितीत जो अपंगाचा जिल्हा व्यापी मेळावा झाला होता त्या मेळाव्यात राहुरी येथील रामकृष्ण मासारे व त्यांच्या पत्नी ह्यांनी त्यांच्या कुटुंबाची जेव्हा हकिगत सांगितली तेव्हा उपस्थित सर्वांच्या डोळ्यात अश्रु आले.श्री मासारे ह्यांनी त्यांची परिस्थिति उपस्थिताना ऐकवताच श्री कडु ह्यांनी तत्कालीन नगराध्यक्षा सौ तनपुरे ह्यांना मासारे कुटुंबास जागा किंवा घर उपलब्ध करून देण्याचे आवाहन केले होते.

श्री कडू ह्यांच्या भाषण ऐकून नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे भावनिक होऊन आमदार कडू ह्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन मासारे कुटुंबाला निश्चित घर दिले जाईल असे आश्वासन दिले.नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे त्यावेळी वास्तविक नगराध्यक्ष पण झालेले नव्हते त्यानी दुसऱ्या दिवशी श्री कडुच्या आवाहानास प्रतिसाद देत मासरे कुटुंबाची समक्ष भेट घेऊन त्यांची अडी अडचणची विचारपुस करून दुसऱ्या दिवशी तनपुरे वाडी येथील श्रीपाद कुलकर्णी ह्यांना 1 गुंठा जमीन मागितली असता चांगल्या कार्यास आपली 1गुंठा जागा अतिशय कमी किमतीस देण्याची तयारी दाखवताच मासारे ह्यांचे जागेचा प्रश्न मार्गी लागला. 13 सप्टेंबर हा नगराध्यक्ष तनपुरे ह्यांचा वाढदिवस असल्याने त्यानी वाढदिवसाचे सर्व कार्यक्रम रद्द करून वाढदिवसा निमित्त कार्यकर्ते ह्यांना हार फुले बुके अश्या वस्तु न आणता रोख रक्कम देण्याचे आवाहन केले होते. त्यास तालुक्यातील कार्यकर्ते विविध संस्था संघटना ह्यांनी आमदार बच्चू कडु ह्यांचे उपस्थितीत कार्यक्रम घेऊन अनेक कार्यक्रत्यानी घर बांधनी साठी लागणाऱ्या वस्तु भेट दिल्या.जवळ पास 2 वर्षानी कोणतीही शासकीय मदत निधी न घेता श्री तनपुरे ह्यांनी श्री मासारे कुटुंबाला हक्काचे घर बांधून दिले असून त्यात अनेक ज्ञात अज्ञात व्यक्तिनी संघटना संस्था ह्यांनी मदत दिल्याने आज मासारे कुटुंबाच्या घराच्या वास्तु शांत गृह प्रवेशाचे कार्यक्रमास स्वत आमदार कडू नगराध्यक्ष तनपुरे ह्यांनी उपस्थित राहील्याने मासरे कुटुंबाचा आनंद गगनात मावेनासा झाला.

यावेळी आमदार कडु म्हणाले एका अपंग कुटुंबाला हक्काचे घर मिळवून देणारे राहुरी नगरपालिका ही राज्यातील पहिली पालिका असून नगराध्यक्ष तनपुरे ह्यांना म्हणाले राजकारण करताना गोर गरीब दलित वंचित ह्यांना सहकार्य करण्या सारखे दूसरे कुठले कार्य नाही त्यांना मदतीचा हात द्या ते निश्चित उपयोगी येईल केलेले कार्य मोठे आहे.

यावेळी श्रीपाद कुलकर्णी गोविंद राव कदम नगरसेवक नंदकुमार तनपुरे दिलीप चौधरी बाळासाहेब उंडे अशोक आहेर गजानन सातभाई संजय साळवे दशरथ पोपळघट अशोक कदम सुयोग नालकर आदिनाथ तनपुरे प्रवीण कदम किसन खंडागळे पांडुरंग उदावंत छबु अडागळे आदि उपस्थित होते.