मीरा गडाख राज्यात प्रथम
प्रतिनिधी । संगमनेर - राज्यस्तरीय मंथन प्रज्ञाशोध परीक्षेत येथील मीरा विनायक गडाख या विद्यार्थिनीने २०० पैकी १९८ गुण मिळवत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. पिंपळे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची ही विद्यार्थिनी असून ती दुसरीत शिकते. मीराने यावर्षी जिल्हा परिषदेतर्फे झालेल्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये किलबिल गटात प्रथम क्रमांक मिळवला. या स्पर्धा शाळा, केंद्र व तालुका पातळी अशा अत्यंत चुरशीच्या झाल्या होत्या. सावित्रीबाई फुले प्रज्ञाशोध परीक्षेत मीरा जिल्ह्यात प्रथम आली. नगर येथील हिंद सेवा मंडळाच्या टॅलेंट सर्च परीक्षेतही तिने चांगले यश मिळवत जिल्ह्यात प्रथम येण्याचा मान मिळवला. मीराने आत्मा मलिक प्रज्ञाशोध परीक्षेत यश संपादन करत राज्यस्तराचे १ हजार रुपयांचे बक्षीस व सन्मानपत्र मिळवले.
