Breaking News

ग्रामीण पत्रकार संघाची अकोले तालुका कार्यकारणी जाहिर


अकोले ( प्रतिनिधी ) - महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाच्या अकोले तालुकाध्यक्षपदी गणेश रामदास आवारी, सचिवपदी अमोल मारुती शिर्के तर जिल्हा कार्यकारिणी सदस्य म्हणून निरंजन देविदास देशमुख यांची एकमताने निवड करण्यात आली. महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाची अकोल्यातील शासकीय विश्रामगृहावर नुकतीच बैठक पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नवगिरे होते. यावेळी पत्रकार संघाचे जिल्हा सचिव अनिल कोळसे, राहुरीचे माजी नगराध्यक्ष आर.आर.पाटील तनपुरे, राहुरी तालुकाध्यक्ष गोविंद फूनगे, शहराध्यक्ष शंकर पाचर्णे आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हाध्यक्ष, अध्यक्ष व सचिव यांच्या आदेशाने अकोले तालुक्याची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यावेळी अनिल नाईकवाडी, युवराज हंगेकर यांची उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. तसेच निरंजन देशमुख (जिल्हा कार्यकारिणी सदस्य), प्रा.भाऊसाहेब वाकचौरे(मार्गदर्शक), शशी सरोद े(अकोले शहराध्यक्ष), सचिन लगड(खजिनदार), (संजय ठिकेकर(प्रसिद्धीप्रमुख), किशोर कोकाटे(मुळा विभाग प्रमुख), शंकर संगारे(प्रवरा विभाग प्रमुख), नितीन शहा(भंडारदरा विभाग प्रमुख), सुनील लोखंडे, आदित्य भरीतकर(आढला विभाग प्रमुख) राजेंद्र मालूनजकर, प्रवीण धुमाळ, अशोक शेळके (सल्लागार)दिनेश जोरवर, संतोष जाधव(प्रेस फोटोग्राफर)आदींचा कार्यकारिणीत समावेश करण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नवगिरे, प्रा.भाऊसाहेब वाकचौरे, अमोल शिर्के, गणेश आवारी आदींनी मनोगते व्यक्त केली. या बैठकीस पत्रकार बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शहराध्यक्ष शशी सरोदे यांनी केले तर आभार सल्लागार प्रवीण धुमाळ यांनी मानले. नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.