Breaking News

आश्वी खुर्द येथे संत बसवेश्वर जंयती उत्साहात


संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथे श्री संत बस्वेश्वर महाराज यांची जयंती उंबरेश्वर रामेश्वर देवस्थानचे मठाधिपती मंहत दत्तगिरी महाराज यांच्या उपस्थित मोठ्या उत्सहात साजरी करण्यात आली आहे. 

यावेळी मार्गदर्शन करताना मंहतं दत्तगिरी महाराज म्हणाले की, १२ व्या शतकात भारतामध्ये अनेक रुढी, पंरपरा, अधंश्रध्दा, कर्मकांड, विषमता, भेदभाव, स्री दास्यत्वं, जातीयता या गोष्टीमुळे समाज मरगळलेल्या अवस्थेत होता. यावेळी संत बसवेश्वर यांनी समाजामध्ये नवचैतन्य निर्माण करण्याचे काम केले. सरपंच म्हाळू गायकवाड, उपसरपंच सुनिल मांढरे, हभप व्ही. डी. वर्पे, पोलिस पाटील बापुसाहेब गायकवाड, दिगंबर वाळेकर, उमेश मोडसे, महेश तक्ते, प्रा. शिवनाथ तक्ते, मेजर दिलीप तक्ते, देविदास वाळेकर, नरहरी डहाळे आदी उपस्थित होते.