Breaking News

हरणाच्या पाडसाला मिळाले जीवदान


राहुरी : भटक्या कुत्रांनी घेरावा घातलेल्या हरणाच्या कळपातील हरवलेल्या पडसास शेतकर्याकडुन जीवदान दिले. वनविभागाच्या अधिकारयांना माहिती देऊनही वेळेवर न आल्याने वनविभागाची निषक्रीयता चव्हाट्यावर आली. वळण येथील शेतकरी बाबासाहेब आढाव यांच्या शेतात सायंकाळी हरणाचे कळप दिसून आले होते. त्यांच्या घासामधे काही भटके कुत्रे कळपातून हरवलेल्या हरणाच्या पडसाला पंजे मारत होते. यावेळी आढाव यांचे लक्ष गेल्याने त्यांनी भटक्या कुत्र्यांना हाकलून लावत या घाबरलेल्या पडसास धीर दिला. या पाडसाला त्यांनी जनावरांच्या शेडमधे पाणी पाजत पाडसाला जीवदान दिले.