Breaking News

शिर्डीच्या मागण्यांबाबत उद्धव ठाकरे यांना साकडे : जगताप


शिर्डी, साईबाबा संस्थानचे विश्वस्त मंडळ शताब्दी वर्ष जवळ आले असताना प्रशासन अजूनही धोरणात्मक निर्णय घेण्यास तयार नाही. शिवसेनेला यात विचारात घेतले जात नाही. भविष्यातील विश्वस्त घेताना शिर्डीतील स्थानिकांना प्राधान्य द्यावे, याबरोबरच शिर्डीच्या विकासासाठी भरीव स्वरुपात निधी मिळावा, यासह विविध प्रश्नांसंदर्भात महिला आघाडीच्या उत्तर नगर जिल्ह्याच्या प्रमुख अनिता जगताप यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना साकडे घातले. 
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून औरंगाबाद येथे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची बैठक नुकतीच संपन्न झाली. या बैठकीसाठी नगर जिल्ह्यातून शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यात खा. सदाशिव लोखंडे, जिल्हाध्यक्ष रावसाहेब खेवरे, राहाता तालुकाअध्यक्ष संजय शिंदे, शिवसेना महिला आघाडी उत्तर नगर जिल्हाप्रमुख अनिता जगताप, उपप्रमुख सपना मोरे, नाशिक विभागाच्या रजनी नेव्हालकर, विजय काळे आदी उपस्थित होते. 

याबैठकीत शिर्डी येथील महिला मंडळाच्यावतीने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी महिला आघाडीच्या उत्तर नगर जिल्ह्याच्या प्रमुख अनिता जगताप यांनी लक्ष वेधले.  महिला आघाडीचे प्रमुख अनिता जगताप यांनी महिला संघटन करून उत्तर नगर जिल्ह्यात त्याची बांधणी करून लगतच्या काळात लोकसभा असो की विधानसभा सेनेचा उमेदवार व त्याच्या विजयसाठी व शिवसेनेचे ध्येय धोरणे व राजकीय भूमिका सामान्य माणसापर्यंत पोहचवण्यासाठी जगताप यांचा प्रयत्न आहे. शिर्डी परिसरातील मागणीच्या बाबतीत लक्ष वेधून साईबाबा संस्थानच्या हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या अडचणी त्यांचे प्रश्न कॉलेजला परवानगी मिळाली. मात्र त्याची अमलबजावणी तत्काळ होण्याबाबत लक्ष वेधून आपल्या भूमिका मांडली. यावेळी सर्व मागण्या पक्षीय पातळीवर मार्गी लावण्यासाठी आपण लक्ष घालू, असे आश्वासन यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जगताप यांना दिले.