अधीक्षक अभियंता अतुल चव्हाणांच्या कार्यकाळात औरंगाबाद साबां बनले राजकीय अड्डा
औरंगाबाद/ विशेष प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाच्या सेवेत राहून राजकीय महत्वाकांक्षा पोसणारे औरंगाबाद सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण यांनी असूयेतून केलेले भिवाजी जायभाये या अभियंत्यांचे निलंबन वादग्रस्त ठरले आहे. दरम्यान या निलंबनाच्या चर्चेतून पैठण आपेगाव विकास प्राधिकरणाच्या शंभर कोटींच्या कामांसह अतूल चव्हाण यांच्या कार्यकाळात प्रचंड भ्रष्टाचार झाल्याचे वास्तव उघड होऊ लागल्याने शिवक्रांती या सामाजिक संघटनेने अधीक्षक अभियंता अतूल चव्हाण यांची अंमलबजावणी संचालनालयामार्फत (ईडी) चौकशी करावी अशी मागणी केली आहे. चव्हाण -जायभाये वादातून सार्वजनिक बांधकाम खाते राजकारणाचा अड्डा बनल्याच्या आरोपांवर शिक्कामोर्तब झाले आहे.
राजकारणातील प्रभावी नेते पुढारी आपला वकूब वापरून प्रशासनाला आपल्या मर्जीवर खेळवत असल्याचा प्रघात होता. तथापी प्रशासनातील अधिकारप्राप्त मंडळींनी राजक ारणासाठी आपल्या पदाचा वापर केल्याचे आजपर्यंत ऐकीवात नव्हते. तथापी औरंगाबाद सार्वजनिक बांधकाम विभागात सुरू असलेल्या एका निलंबन घटनेतून होत असलेले आरोप सार्वज निक बांधकाम विभाग सक्रीय राजकारणाचा अड्डा बनल्याचे सिध्द झाले आहे. राजकारण्यांच्या तालावर नाचण्यापेक्षा राजकारणात सक्रीय होऊन स्वतःच सत्ताकेंद्र बनण्याची महत्वाकांक्षा अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण यांनी पोसली असल्याचे या घटनेतून स्पष्ट झाले आहे.
या संदर्भात प्राप्त माहिती अशी की, पैठण आपेगावा विकास प्राधिकरणाच्या शंभर कोटीच्या कामात गैरव्यवहार झाल्याची चर्चा सुरू झाल्यानंतर चौकशी होऊन काही अभियंत्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. या निलंबन कारवाईत अभियंता भिवाजी जायभाये यांचा समावेश कळीचा मुद्दा ठरला असून अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण यांनी त्यांच्या पत्नीच्या जिल्हा परिषद सभापती पदाच्या निवडणूकीसाठी जि.प. सदस्य असलेल्या जायभाये यांच्या मुलाने मदत केली नाही म्हणून सुड भावनेने निलंबन केले असा आरोप निलंबित अभियंता भिवाजी जायभाये यांनी अतुल चव्हाण यांच्यावर केला आहे.
भिवाजी जायभाये यांनी केलेला आरोप राजकीय दृष्ट्या पारंपारिक असला तरी शासकीय सेवेत असलेल्या प्रशासकीय अधिकार्यांनी शासकीय आवाराचा वापर राजकारणासाठी क रणे शासकीय सेवा शर्तींचा भंग आहे. ही बाब गंभीर आहे. या आरोपातील बारकावे आणि प्रचंड व्याप्ती असलेल्या या भ्रष्टाचाराच्या प्रकरणाचा विचार करता अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण यांनी केलेले केवळ तीन अभियंत्यांचे निलंबन संशयाला वाव देत आहे. म्हणूनच मुंबई साबांतही वादग्रस्त ठरलेले अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण यांची औरंगाबाद साबांतील क ारकीर्दही संशयाच्या गर्तेत सापडून वादग्रस्त ठरली आहे. प्रचंड व्याप्ती असलेल्या या भ्रष्टाचार प्रकरणात केवळ तीन अभियंते दोषी असतील ही बाब वस्तुस्थितीचा विपर्यास ठरते.
या पार्श्वभूमीवर पैठण आपेगाव विकास प्राधिकरणातील शंभर कोटींच्या बोगस कामांसोबत अन्य कामांमध्ये झालेला घोटाळाही चव्हाट्यावर आला असून अतुल चव्हाण यांची एकू ण कारकीर्द वादग्रस्त आणि भ्रष्ट असल्याचा आरोप शिवक्रांती सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय सावंत यांनी केला आहे. या संदर्भात अतुल चव्हाण यांची अंमलबजावणी संचालनालयामार्फत सखोल चौकशी करावी अशी मागणीही संजय सावंत यांनी केली आहे.(क्रमशः)