Breaking News

राजपाल यादवला सहा महिन्यांची शिक्षा


दिल्ली : चेक बाऊंस प्रकरणी बॉलिवूडचा विनोदी अभिनेता राजपाल यादवला दिल्लीच्या कोर्टाने दोषी ठरवत सहा महिन्यांची शिक्षा सुनावली होती. या प्रकरणी राजपालला जामीन ही मिळाला. दिल्लीच्या कोर्टाने राजपाल यादव आणि त्याच्या पत्नीला दोषी ठरवलंय. कोर्टाने दोघांनाही सात प्रकरणामध्ये दोषी ठरवत 1 कोटी 60 हजारांचा दंड ठोठावलाय. जर सहा महिन्यांमध्ये दंड भरला नाही तर शिक्षेत वाढ केली जाईल असा इशाराही कोर्टाने दिला. लक्ष्मीनगर स्थित मुरली प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने तक्रार केली होती यावर कोर्टाने आपला निर्णय दिला.