Breaking News

‘चिंचपूर’ संस्थेच्या अध्यक्षपदी नामदेव वर्पे; उपाध्यक्षपदी तांबे


संगमनेर तालुक्यातील अग्रगण्य अशा चिंचपूर येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी नामदेव चिमाजी वर्पे यांची तर उपाध्यक्षपदी सचिन सुरेश तांबे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
या संस्थेच्या सभागृहात उपनिबंधक आर. एस. जोशी, पद्मश्री विखे पाटील कारखान्याचे उपाध्यक्ष कैलास तांबे यांच्या उपस्थितीत ही निवड प्रक्रिया पार पडली. अध्यक्षपदासाठी नामदेव चिमाजी वर्पे व उपाध्यक्ष पदासाठी सचिन सुरेश तांबे यांनी एकमेव अर्ज दाखल केले होते. त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली आहे. यावेळी दत्तात्रय तांबे, गिताराम पवार, गजाबा तांबे, ज्ञानदेव थेटे, कौडीराम तांबे, संपतराव लोहाटे, शंकर तांबे आदींसह संस्थेचे सभासद उपस्थित होते. या निवडीबद्दल विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, पद्मश्री विखे कारखान्याचे उपाध्यक्ष कैलास तांबे, जि. प. सदस्य अॅड. रोहीणी निघुते यांनी नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.