Breaking News

छायाचित्रकार संघटनेचे नूतन अध्यक्ष नवले यांचा सत्कार


राहुरी तालुका फोटोग्राफर सामाजिक संस्थेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत कुलदीप नवले विजयी झाले. त्याबद्दल त्यांचा कोल्हार येथील छायाचित्रकाराच्यावतीने पत्रकार संजय शिवलेकर व सुनील वैद्य यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
राहुरी तालुका फोटोग्राफर सामाजिक संस्था नोंदणीकृत असल्याने प्रथमच निवडणुकीद्वारे मतदान प्रक्रिया राबविण्यात आली. यामध्ये सुमारे २०० हून अधिक फोटोग्राफर्स मतदान प्रक्रियेत सहभागी झाले होते. मतदान निवडणुकीनंतर कुलदीप नवले अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी झाले. या निवडणुकीत उपाध्यक्षपदी ईश्वर लहारे निवडून आले. राहता तालुक्यातील कोल्हार भगवतीपूर येथे नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी उपाध्यक्ष गणेश नेहे, विजय बोडखे, बापू कडू, गंगाधर गीते, किरण शिंदे, रवी सूर्यवंशी, ऋषिकेश कुलकर्णी, सुभाष कोंडेकर, पप्पू चिकणे, अविनाश कोंडेकर, मयूर मेहेत्रे आदी उपस्थित होते.