Breaking News

इंधन दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचा रास्ता रोको


नाशिक, पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅसच्या दरवाढीच्या निषेधार्थ नाशिक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नाशिक-पुणे महामार्गावरील सिन्नर येथे शुक्रवार, 6 एप्रिल रोजी रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रविंद्र पगार यांनी दिली आहे.

पेट्रोल, डिझेलची मोठया प्रमाणात दरवाढ झाल्याने महागाईचा भडका उडण्याची भीती देखील व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅसचे दर कमी करण्यासाठी भाजप - शिवसेना युती सरकारने तातडीने हस्तक्षेप करून इंधनाचे भाव कमी करून सर्वसामान्य जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी अ‍ॅड. पगार यांनी केली आहे. या आंदोलनात पक्षाचे नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी व शेतकरी यांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही अ‍ॅड. पगार यांनी केले.