Breaking News

श्रीगोंदा तालुक्यातील शेडगाव येथ धाडसीे चोरी

(श्रीगोंदा/प्रतिनिधी)- श्रीगोंदा तालुक्यातील शेडगाव येथील बेबीसार सर्जेराव झेंडे यांच्या घरी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास दोन अज्ञात चोरट्यानी लोखंडी रॉडचा धाक दाखवून त्यांच्या पत्नी, आई व भावजयी व भाची यांच्या अंगावरील व कपाटातील दागिने व रोख रक्कम असा जवळपास 1,24,000 रुपये किंमतीचा ऐवज चोरून नेला. झेंडे यांनी या घटनेबाबत श्रीगोंदा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून दोन अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

याबाबत माहिती अशी की बेबीसार झेंडे हे शेडगाव येथे आपल्या कुटुंबासह राहातात पेंटर काम व शेती करून ते आपली उपजीवीका करतात. दि 21 रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास झेंडे व त्यांच्या कुटुंबीयांनी जेवण केले व त्यानंतर ते झोपले .झेंडे व त्यांच्या पत्नी त्यांची लहान मुले एका बेडरूममध्ये झोपले . त्यांच्या आई जाणकाबाई या हॉलमध्ये एकट्या झोपल्या तर झेंडे यांची भाची व भावजयी या दोघी दुसर्‍या बेडरुममध्ये झोपल्या असता आज दि 22 रोजी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास झेंडे यांच्या पत्नी तृप्ती यांना घरामध्ये माणसासारखी सावली दिसली तेव्हा त्यांनी उठून पाहिले असता अंदाजे 25 ते 30 वर्ष वयाचा रंगाने सावळा, तोंडाला व डोक्याला पूर्णपणे रुमाल बांधलेले व अंगात काळे रंगाचे कपडे व हातात लोखंडी रॉड घेतलेला एक ईसम पाहिला तो झेंडे झोपलेल्या बेडरूममध्ये आला व तो त्यांना हिंदीत म्हणाला की आप लोक चुपचाप सो जाओ हम तुमको कूच नही करेंगे हमे सिर्फ डाग चाहीए त्यामुळे घाबरलेल्या अवस्थेतील झेंडे पती पत्नी त्यांच्या मुलांसह तसेच गुपचूप पडून राहिले त्यावेळी हा आवाज ऐकून हॉलमध्ये झोपलेल्या झेंडे यांच्या आई या बेडरूममध्ये आल्या त्यांच्या पाठोपाठ अंदाजे 40ते 45 वर्षे वयोगटातील रंगाने गोरा, बुटका हातात लोखंडी रॉड असणारा व्यक्ती बेडरूममध्ये आला त्याने झेंडे यांच्या पत्नी व आई यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने लोखंडी रॉडचा धाक दाखवून बळजबरीने काढून घेतले त्यानंतर त्या दोघांमधील एकजण झेंडे यांच्या भावजयी व भाची झोपलेल्या बेडरूममध्ये गेला तेथे जाऊन त्याने त्यांच्या अंगावरील व कपाटामधील सोन्याचे दागिने तसेच घरातील सामानाची उचकापाचक करून दहा हजार रुपये रोख एक मोबाईल असा जवळपास 1,24,000रुपये किंमतीचा ऐवज बळजबरीने चोरून नेला अशाप्रकारे धाक दाखवत झेंडे यांच्या कुटुंबियांसमोरच चोरट्यांनी ऐवज चोरून नेल्यामुळे झेंडे कुटुंबीय चांगलेच घाबरून गेले. दरम्यान आज घटनास्थळी श्‍वानपथकाला पाचारण करण्यात आले होते. त्या श्‍वानाने घराबाहेर पूर्वेला 500 मीटरवर शेडगाव ते राशीन डांबरी रस्त्यापर्यंत माग काढला व तिथे ते श्‍वान घुटमळले घटनास्थळी पो. नि. बाजीराव पोवार यांनी भेट देऊन पाहणी केली.