Breaking News

पाथर्डी तालुका पत्रकार संघाची बैठक उत्साहात

पाडळी प्रतिनिधी - पाथर्डी तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी रामदास शिंदे व विलास मुखेकर यांच्या नावाची सर्वानुमते घोषणा करण्यात आली. पत्रकार रामदास शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मढी येथे पार पडलेल्या बैठकीत हि निवड करण्यात आली. यावेळी तालुका उपाध्यक्ष रमेश देवा जोशी व शिवदास मरकड यांची निवड करण्यात आली. तालुका कार्यकारणीत कार्याध्यक्ष सतीश जगताप, सचिव कृष्ण आंदुरे, खजिनदार वजीर शेख, सहखजिनदार, रमेश पाथरकर प्रेस फोटोग्राफर अजय गांधी, मदन म्हस्के, दीपक गोल्हार यांची निवड करण्यात आली. इलेक्ट्रॉनिक मिडिया, भिवसेन टेमकर अमोल कांकरीया यांची निवड करण्यात आली. सदस्य-सचिन नन्नवरे, अर्जुन देशमुख, रामदास भवार, शिवाजी बोंदरे, सुनिल पळसे, जनार्धन बोडखे, बाळासाहेब कोठुळे यांचा समावेश आहे. सल्लागार - संजयकुमार पाठक, अविनाश मंत्री, महादेव दळे, तुळशीदास मुखेकर यांची निवड करण्यात आली. नुतन पदाधिकार्‍यांचा कानिफनाथ देवस्थानाचे अध्यक्ष अप्पासाहेब मरकड , माजी सरपंच देविदास मरकड, व्यवस्थापक अशोक पवार, नवनाथ आरोळे यांच्या हस्ते सर्व पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विविध दैनिकांचे व इलेक्ट्रॉनिक्स मेडिया चे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी तालुका पत्रकार संघाच्या वतीने देवस्थानास विकास कामासाठी निधी देऊन एक चांगल्या कामाची सुरवात संघाकडून झाली. असे देवस्थानचे अध्यक्ष मरकड म्हणाले. जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत तुमची अधिका अधिक प्रगती होवो अशा शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमासाठी देवस्थानच्या कर्मचार्‍यांनी सहकार्य केले. तसेच या कार्यक्रमासाठी शिवदास मरकड यांनी खूप परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब कोठुळे यांनी केले तर आभार रमेश देवा जोशी यांनी मानले.