Breaking News

‘डॉक्टर्स अँड केमिस्ट’ पतसंस्थेला १८ लाख नफा


राहुरी तालुका डॉक्टर्स अँड केमिस्ट अर्बन को ऑप सोसायटी या पतसंस्थेस संपलेल्या आर्थिक वर्षात (२०१७-२०१८) १८ लाख रूपये नफा झाल्याची माहीती संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय भळगट यांनी दिली.
ते म्हणाले, या संस्थेची वार्षिक उलाढाल २३ कोटी ९५ लाख रूपये आहे. ठेवी १६ कोटी ९० लाख असून संस्थेने १२ कोटी रुपये कर्ज वाटप केले आहे. ६ लाख गुंतवणूक, ७ कोटी ८१ लाख वसूल, भाग भांडवल ७५ लाख, सीडी रेशो ६६. 66. इतका आहे. संस्थेचे ३१ मार्च २०१८ अखेर ४४५ सभासद असून दरवर्षी प्रमाणे १५ टक्के लाभांश देणार असल्याची घोषणा संस्थेच्या उपाध्यक्षा डॉ. ज्योती महेश कोहकडे यांनी दिली. डॉ भळगट म्हणाले, की संस्थेस स्थापनेपासून सातत्याने ‘अ’ ऑडीट वर्ग मिळत असून संस्थेमार्फत अनेक गरजू डॉक्टर औषधविक्रेते लॅबोरटरीधारक, शेतकरी, दूध उत्पादक, लहान मोठे व्यावसायिक यांना कर्ज वितरण करत आहे. सोनेतारण कर्जावर व्याजदर १२ टक्के आकरण्यात येत आहे. 

उपाध्यक्षा डॉ. ज्योती कोहकडे, संचालक डॉ. विलास पाटील, डॉ. दत्तात्रय वने. डॉ. चंद्रकांत गिरगुणे, डॉ. सोपान हारदे, डॉ. ए. आर. सी. सय्यद, डॉ. हेमा वैरागर, नगरसेवक सूर्यकांत भुजाडी, जयश्री विजय मोटे, डॉ. सोपान गाड़े, सुदेश सुराणा संस्थेचे सचिव बाबासाहेब शिंगोटे, कर्मचारी दैनंदिन धन्वंतरी ठेव प्रतिनिधी, सभासद, कर्जदार आदींचे यासाठी सहकार्य मिळत असून या संस्थेची सातत्याने यशोशिखराकडे वाटचाल सुरु आहे.