Breaking News

आत्मदहनाच्या इशार्‍यानंतर चंद्रकांत दादा पाटलांची हवा टाईट


शेवगाव, लोकप्रतिनिधी अर्थातच जनतेचे सेवक, मात्र याच लोकप्रतिनिधींना जनतेचे प्रश्‍न जाणून घेण्याची तळमळ, इच्छाशक्ती नसल्याचे दिसून येत आहे. असाच क ाहीसा उद्दामपणाचा अनुभव स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पाथर्डी तालुका अध्यक्ष शरद मरकड यांना देखील आला. दुध दराबाबत महसूलमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी निवेदन देण्यासाठी गेलेल्या शरद मरकड यांचे निवेदन चंद्रकांतदादा पाटील यांनी फेकून आपल्या असंस्कृतपणाचे दर्शन घडवले. मात्र मरकड यांनी आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतर मात्र नामदार चंद्रकांतदादा पाटलांची हवा टाईट झाली.
 
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पाथर्डी तालुका अध्यक्ष शरद मरकड हे महसूलमंत्री चंद्रकांत दादांच्या भेटीला कोल्हापूर येथे गेले होते. दुधाला दर कमी झाल्यामुळे पाथर्डी तालुका स्वाभिमानी संघटनेच्या वतीने पाथर्डी तालुका प्रतिनीधी म्हणुन दुध दराबाबत निवेदन घेऊन महसुल मंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या ‘संभाजीनगर’ च्या निवासस्थानी दि 22 एप्रिल रोजी निवेदन घेऊन गेले होते. सुमारे मी तीन ते चार तास त्यांच्या घरासमोर वाट बघितल्यानंतर अखेर तीन-चार तासांनंतर चंद्रकांत दादा पाटील बाहेर आले. तरीही त्यांनी पाथर्डी तालुका स्वाभिमानी शेतकरीचे अध्यक्ष शरद मरकळ यांचे निवेदन घेतले नाही. चंद्रकांत दादा बोलायला पण तयार नव्हते अखेर ते निवेदन शरद मरकड यांनी त्यांच्या गाडीत चालता चालता दिले, तरी दादांनी ते निवेदन परत गाडीच्या बाहेर फेकले. त्यानंतर दुसर्‍या मरकड यांनी चंद्रकांत दादांना फॅक्स केला. या फॅक्समध्ये मरकड म्हणतात, नामदार साहेब मी अहमदनगर वरून दुध दरासंदर्भात निवेदन घेऊन आलो होतो पण दादा तुमच्याकडे एक मिनिट वेळ पण नव्हता निवेदन स्वीकारायला तुम्हाला जनतेचे कामे करायचे नव्हते तर कशाला मंत्री झालात? मी तुमच्या निवासस्थानी सुमारे चार तास निवेदन घेऊन बसलो होतो तुम्ही त्याकडे कुठल्याही प्रकारे पाहायला तयार नव्हते तुमचे तर अंगरक्षक मला तिथं थांबु पण देत नव्हते ! जर माझ्या एकटयाच्या बलिदानाने दुधाला दर भेटत असेल, तर मी ही गोष्ट आनंदाने स्वीकारेन.