Breaking News

अतिक्रमणात येणार्‍या दुकानांचे पुनर्वसनाचे नगराध्यक्षांकडून आश्‍वासन


श्रीगोंदा शहरातील दौंड-जामखेड रोडचे काम सुरू आहे. त्यामुळे रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकाने काढावी लागतील त्यासाठी माजी मंत्री बबनराव पाचपुते व नगराध्यक्ष मनोहर पोटे यांच्यासह नगसेवक यांनी त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्‍न निर्माण झाला, तो कसा मिटवून घेता येईल या विषयावर काल चर्चा झाली. 

सर्व दुकाने कसे चालू राहतील यावर चर्चा झाली. सर्व दुकानदारांनी सहकार्य करण्याचे आश्‍वासन दिले. यावेळी नगरसेवक अशोक खेंडके, मिलिंद दरेकर, सतिश मखरे, सुनील वाळके, संतोष क्षीरसागर, भागचंद घोडके, डॉ. अनिल घोडके, शिवा ताडे आदी उपस्थित होते.