Breaking News

जीएसटी आयुक्त संसार चंद यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल.

नवी दिल्ली : लाचप्रकरणी वस्तू व सेवा कर (जीएसटी) आयुक्त संसार चंद यांच्या विरोधात प्रथमच केंद्रीय तपास पथका (सीबीआय)ने आरोपपत्र दाखल केले आहे. जीएसटी विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यावर भ्रष्टाचारप्रकरणी प्रथमच गुन्हा दाखल केल्याची माहिती यावेळी सीबीआयच्या अधिकाऱ्याने दिली. भारतीय महसूल सेवेतील १९८६ बॅचचे अधिकारी संसार चंद यांची जीएसटी विभागाचे वरिष्ठ अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. कानपूर येथे एका व्यापाऱ्याकडून दीड लाख रुपयांची लाच घेताना त्यांची पत्नी अविनाश कौर यांना अटक केली. त्यानंतर १३ जणांवर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले. त्यानंतर चौकशीला सुरुवात झाली.