नक्षली मनिलाँड्रिंगची चौकशी एनआयए करणार.
नवी दिल्ली : नक्षली नेते व त्यांच्या समर्थकांवर लक्ष ठेवण्यासाठी केंद्रीय तपास संस्था (एनआयए)ची विशेष शाखा गठित केली असून मनी लाँड्रिंग करणाऱ्या नक्षल्यांची चौकशी करणार असल्याची माहिती गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दिली. काश्मीर खोऱ्यातील काही फुटिरतावादी नेत्यांना दहशतवाद्यांकडून आर्थिक साह्य होत असल्याचे एनआयच्या तपासात उघड झाले. यादरम्यान गत फेब्रुवारी महिन्यात अंमलबजावणी संचालयाने झारखंडमधील नक्षली कमांडर जप्त केल्यानंतर गृहमंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. झारखंड, बिहार, छत्तीसगड या भागांतील अनेक ठेकेदार नक्षली नेत्यांसाठी मनीलाँड्रिंग करत असल्याचे उघड झाल्यानंतर गृहमंत्रालयाने दहशतवाद व नक्षलवादाला आळा घालण्यासाठी एनआयएची विशेष शाखा गठित केली आहे.
