देशांतर्गत विमानांचे दळणवळण २८ टक्के वाढले.
नवी दिल्ली : नागरी हवाई वाहतूक संचलनालयाच्या (डीजीसीए) माहितीनुसार मार्च २०१८ मध्ये देशांतर्गत विमान प्रवाशांची संख्या वाढून १.१५ कोटी इतकी झाली आहे. गतवर्षाच्या मार्च महिन्याच्या तुलनेत ही संख्या २८.३ टक्के अधिक आहे. गेल्यावर्षी या कालावधीमध्ये १.०७ कोटी प्रवाशांची संख्या नोंदली गेली होती. फेब्रुवारीमध्ये विमान प्रवाशांची संख्याही वाढून ९०.४५ लाख इतकी झाली. या वर्षी जानेवारी ते मार्च या काळात प्रवाशांची संख्या २३.८७ टक्क्यांनी वाढली आहे. देशांतर्गत विमान सेवांमुळे या कालावधीत ३३७.९० लाख प्रवाशांनी प्रवास केला. गेल्यावर्षी यातच कालावधीत २७२.७९ लाख प्रवाशांनी प्रवास केला होता.
