Breaking News

धार्मिक अधिकार्‍यांच्या भरतीत घोटाळा लष्कराच्या अधिकार्‍यांवर गुन्हा दाखल


हैदराबाद : लष्करात धार्मिक गुरुंच्या भरतीत झालेल्या कथित अनियमिततेप्रकरणी, गुन्हे अन्वेशन विभागाने (सीबीआय) लष्कराच्या अधिकार्‍यांसह काही जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. याप्रकरणात एकूण 17 जणांचा हात असल्याचे सीबीआयला आढळून आले आहे.
मेजर जनरल एन. श्रीनिवास यांनी काल हैदराबादमध्ये तक्रार दाखल केली. यात सार्वजनिक क्षेत्रातील नोकरदारांकडून गुन्हा केला जात असल्याचे म्हटले आहे. यात अनेकांनी गुन्हेगारी स्वरुपाचा कट रचणे, फसवणूक आणि प्रॉपर्टी वितरणात घोटाळा केल्याचा आरोप करण्यात आला आहे. लेखी तक्रारीत म्हणण्यात आले आहे, की भरती संचालनालयाच्या जुलै 2013 च्या आदेशानुसार हैदराबाद येथील आर्टिलरी सेंटरतर्फे धार्मिक गुरुंची भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली होती. सैनिकांना आध्यात्मिक प्रेरणा देण्याकरिता शिक्षकांचा समावेश करण्यात आला होता. या प्रकरणातील मुख्य आरोपी हा, 32 फिल्ड रेजिमेंटमध्ये असून तो या भरती प्रक्रिया प्रभावित करणार्‍या रॅकेटचा मास्टरमाईंड आहे. तक्रारकरत्याने भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा, 1988 च्या कलम 7 नुसार तत्काळ चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली आहे.