Breaking News

‘अमृतवाहिनी’च्या संचालकपदी कचरु फड


संगमनेर प्रतिनिधी - तालुक्याच्या आर्थिक विकासाची कामधेनू असलेल्या भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारि बँकेच्या नवनाथ अरगडे यांच्या रिक्त झालेल्या संचालकपदाच्या जागेवर कचरु फड यांची निवड झाली. अमृतवाहिनी बँकेच्या मथुराबाई भाऊसाहेब थोरात सभागृहात बँकेचे अध्यक्ष अमित पंडीत, उपाध्यक्ष दत्तात्रय खुळे, मॅनेंजर लक्ष्मण वाघ, संचालक मंडळ आदींच्या उपस्थितीत फड यांची करण्यात आली. 

काँग्रेस नेते आ. बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली अमृतवाहिनी बँकेचे सभासद व ठेवीदार यांचा मोठा विश्‍वास मिळविला आहे. आपल्या गौरवपूर्ण वाटचालीत अमृतवाहिनी बँकेने कायम ‘अ’ ऑडिट वर्ग मिळविला आहे. तालुक्याच्या विकासाला मदत करण्याचे साधन म्हणून अमृतवाहिनी बँकेकडे आज पाहिले जात आहे. 

या निवडीबद्दल माजी महसूलमंत्री आ. बाळासाहेब थोरात, आ. डॉ. सुधीर तांबे, बाजीराव खेमनर, अ‍ॅड. माधवराव कानवडे, अध्यक्ष अमित पंडीत, उपाध्यक्ष दत्तात्रय खुळे, मॅनेजर लक्ष्मण वाघ, रामदास वाघ, नगराध्यक्षा दुर्गा तांबे, रणजितसिंह देशमुख, शिवाजीराव देशमुख, सत्यजित तांबे आदींसह अमृत उद्योग समुहातील विविध पदाधिकार्‍यांनी फड यांचे अभिनंदन केले.