Breaking News

शेतकर्‍यांना कर्जमाफी अर्ज भरण्यास मुदतवाढ


पुणे : राज्यातील शेतकर्‍यांच्या कर्जमाफी संदर्भात जाहीर करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेला मुदतवाढ देण्यात आली आहे. यापुर्वी 31 मार्च पर्यंत असलेली मुदत वाढवून ही मुदत 14 एप्रिल करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी आणखी 14 दिवसांचा कालावधी मिळणार आहेत. राज्यातील शेतकर्‍यांसाठी राज्य शासानाने ही अभिनव योजना जाहीर केली आहे. या योजनेचा लाभ आतापर्यंत लाखो शेतकर्‍यांनी घेतला आहे. सुरुवातीला या योजनेत ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत 1 मार्च अशी होती, ती वाढवून 31 मार्च करण्यात आली. आता, हीच मुदत 14 एप्रिलपर्यंत वाढविण्यात आली आहे. राज्यातील एकही शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहता कामा नये, यासाठी हा प्रयत्न असल्याचे शासनाच्यावतीने सांगण्यात आले. त्याचबरोबर ज्यांनी दिड लाखांवरील कर्ज घेतली आहे, त्यांनी वन टाईम सेंटलमेन्टसाठी दिलेली मुदत देखील वाढविण्यात आली आहे. ही मुदत आता 31 जूनपर्यंत राहणार आहे.