Breaking News

कान्स महोत्सवासाठी तीन मराठी चित्रपटांची निवड


मुंबई : मराठी चित्रपटांना जागतिक बाजारपेठ उपलब्ध व्हावी या हेतूने फ्रान्समध्ये दिनांक 8 मे 2018 ते 18 मे 2018 या कालावधीत होणार्‍या कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात राज्य शासनाकडून पाठविण्यात येणार्‍या 3 चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. निवड करण्यात आलेले चित्रपट पुढीलप्रमाणे- 1) इडक (मे.किया फिल्मस प्रा.लि.), 2) क्षितीज (मे.मिडिया फिल्म क्राफट), 3) पळशीची पी.टी. (मे.ग्रीन ट्री प्रोडक्शन)या चित्रपट महोत्सवाच्या चित्रपटांसाठी 26 मराठी चित्रपटांचे परिक्षण करण्यात आले. या 26 चित्रपटातून परिक्षण समितीने उपरोक्त 3 चित्रपटांची निवड कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी केली आहे.