सर्वोच्च न्यायालयाचे अस्तित्व धोक्यात : न्या. कोरियन
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाचं अस्तित्व धोक्मयात असल्याचे मत न्यायाधीश कुरियन जोसेफ यांनी व्यक्त केले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या नियुक्ती प्रक्रियेत होणा़र्या विलंबाबद्दल न्यायाधीश कुरियन जोसेफ यांनी सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांना पत्र लिहिले आहे.‘कॉलेजियमच्या शिफारसीनंतरही न्यायाधीशांच्या नियुक्त्यांना उशीर होत आहे. या समस्येवर मार्ग काढण्याची आवश्यकता आहे,’ असे न्यायाधीश कुरियन जोसेफ यांनी सरन्यायाधीशांना लिहिलेल्या पत्रात नमूद केलं आहे. न्यायाधीशांच्या नियुक्तीत होत असल्याबद्दल विलंबाबद्दल जोसेफ यांनी चिंता व्यक्त केली आहे. ‘सर्वोच्च न्यायालयानं या प्रकरणात कोणतेही पाऊल न उचलल्यास इतिहास आपल्याला कधीही माफ करणार नाही, असं जोसेफ यांनी पत्रात म्हटले आहे