कणकवलीत राणेंनी जपला ’स्वाभिमान’ 17 पैकी 11 जागांवर ‘स्वाभिमानी’ चे निर्विवाद वर्चस्व
सिंधुदुर्ग : कणकवली नगरपंचायतीवर राणेंच्या स्वाभिमान पक्षाने झेंडा फडकावला आहे. या निवडणूकीत 17 पैकी 11 जागांवर विजय मिळवत राणेंनी ’स्वाभिमान’ जपला आहे. कणकवलीच्या नगराध्यक्षपदी स्वाभिमान-राष्ट्रवादी आघाडीच्या समीर नलावडे यांची निवड करण्यात आली आहे. नलावडे यांना 4094 मते मिळाली असून त्यांनी 37 मतांनी विजय मिळवला. कणकवली नगरपंचायत निवडणुकीसाठी सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. पहिल्या फेरीपासूनच स्वाभिमानने विजयी घोडदौड सुरू केली. पहिल्या तीन प्रभागात स्वाभिमानचे सर्वच उमेदवार निवडून आले. त्यानंतर पुढील दोन्ही फेर्यांमध्ये ही घोडदौड अशीच सुरू राहिली. शिवसेना भाजप युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संदेश पारकर आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे उमेदवार समीर नलावडे यांच्यात चांगलीच लढत पाहायला मिळाली. सुरुवातीला युतीचे संदेश पारकर हे आघाडीवर होते. दुसर्या फेरीत 95 मतांनी आघाडी घेत स्वाभिमानच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराने आघाडी घेतली.
दरम्यान एकीकडे बहुमत मिळाल्यावरही स्वाभिमान पक्षाची नगराध्यक्ष पदासाठी घासाघीस सुरूच होती. अखेरच्या फेरीत ही आघाडी कायम ठेवण्यात स्वाभिमान पक्षाने नगराध्यक्ष पदही खिशात घातले. स्वाभिमानीचे समीर नलावडे 37 मतांनी नगराध्यक्षपदी निवडून आल्याचे कळताच कणकवलीत स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला. आमदार नितेश राणे आगे बढो, हम तुम्हारे साथ है अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. नगराध्यक्ष पदाच्या निवडणूकीत समीर नलावडे 4094 (महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष ) ,संदेश पारकर 4057 ( भाजप शिवसेना युती), राकेश राणे 1149 (शहर वि आघाडी), विलास कोरगावकर 280 (काँग्रेस )नोटा 78 अशी मते पडली. स्वाभिमानच्या विजयानंतर कार्यकर्त्यांनी भव्य रॅली काढली. विजयाचा जल्लोष साजरा करताना विजयाचा गुलाल उधळला. यावेळी आमदार नितेश राणे स्वतः विजयी रॅलीत सहभागी झाले होते.
या निवडणूकीत राणेंच्या स्वाभिमान पक्षाने 17 पैकी 11 जागांवर विजय मिळवत आपले निर्विवाद वर्चस्व कायम राखले आहे. कणकवली नगरपंचायत निवडणूकीतील सर्व 17 जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. नितेश राणे यांच्या स्वाभिमान पक्षाने 11 जागांवर विजय मिळवत कणकवली नगरपंचायतीवर झेंडा फडकवला आहे. विजयी उमेदवारांमध्ये कविता राणे, प्रतीक्षा सावंत, अभिजित मुसळे, मेघा गांगण, सुप्रिया समीर नलावडे, उर्मी योगेश जाधव या स्वाभिमान पक्षाच्या उमेदवारांसह राष्ट्रवादीचे आबिद नाईक व भाजपच्या सुमेधा अंधारी यांचा समावेश आहे.