Breaking News

फुले-आंबेडकरांनी सामाजिक विषमतेची दरी दूर केली - देवकी ढोकणे


भेंडा (प्रतिनिधी ):-- सामाजिक विषमता दूर करायची असेल तर शिक्षण महत्वाचे आहे हे ओळखून महात्मा फुले व डॉ.आंबेडकर यांनी शिक्षणाचे शस्र हाती घेऊन समाजातील सामाजिक विषमतेची दरी दूर केली असे प्रतिपादन कु. देवकी ढोकणे यांनी केले. भेंडा येथील ज्ञानेश्‍वर उद्योग समूह व सांस्कृतिक मंडळाचे वतीने महात्मा ज्योतिराव फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती निमित्त आयोजीत व्याखान प्रसंगी कु.ढोकणे बोलत होतीे.कारखान्याचे उपाध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंगअध्यक्षस्थानी होते. यावेळी कारखान्याचे संचालक काशिनाथ नवले ,कामगार संचालक सुखदेव फुलारी,बापूसाहेब सुपारे, कार्यकारी संचालक अनिल शेवाळे,सरव्यस्थापक काकासाहेब शिंदे,प्रशासकीय अधिकारी कारभारी गायके,कार्यालयीन अधीक्षक नामदेव पुंड,वर्क्स मॅनेजर एस डी चौधरी,चिफ अकाउंटंट रामनाथ गरड,श्री.शेंडगे,कामगार अधिकारी बाळासाहेब डोहाळे,संभाजी माळवदे,भानुदास कावरे,सांस्कृतिक मंडळाचे सचिव कृष्णा उगले,मानद सचिव अप्पासाहेब बोडखे,प्रा.डॉ.शिरीष लांडगे,प्रा.डॉ.संजय दरवडे,भाउसाहेब ढोकणे,जनार्दन नेमाने, प्रकाश कुटे, विष्णू नवले, विजय गव्हाणे, पोपट उगले, कल्याण गायकवाड आदी उपस्थित होते. यावेळी माजी आमदार पांडुरंग अभंग, काकासाहेब शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. सांस्कृतिक मंडळाचे खजिनदार कारभारी गरड यांनी प्रास्ताविक केले. कामगार संघटनेचे सेक्रेटरी जनार्दन कदम यांनी आभार मानले.