विद्यार्थ्याच्या मारहाणीबद्दल पालकांमध्ये प्रचंड असंतोष
कर्जत प्रतिनिधी - तालुक्यातील पिंपळवाडी येथे असलेल्या जि. प. शाळेच्या विद्यार्थ्याला शिक्षकाकडून झालेल्या मारहाणीचा पालकांमधून अद्यापही कमालीचा प्रचंड असंतोष खदखदतो आहे. यामुळे या शाळेच्या चिमुकल्यांमध्ये घबराट पसरली आहे.
गणित चुकले, या रागातून येथील शिक्षक चंद्रकांत सोपान शिंदे यांनी रोहन जंजिरे या चिमुकल्याच्या तोंडात हातातील छडी घालून त्याला अमानुष मारहाण केली. यामुळे रोहनच्या घसा आणि टाळूला गंभीर इजा झाली. यामुळे रोहन सध्या मृत्यूशी झुंज देत आहे. त्याच्यावर राशिन आणि बारामती येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर सध्या पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. तोंडात टाळ्याला व घशाला गंभीर दुखापत झाल्याने रोहनला श्वास घेण्यासाठी अडचण येत त्याच्यावर उपचार करण्याचे डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. रोहन उपचाराला प्रतिसाद देत आहे. मात्र शासनाने विशेष तज्ञ डॉक्टरांचे पथक उपचारासाठी पाठवून मदत करावी, असे आवाहन रोहनचे वडील दत्तात्रय जंजिरे यांनी केली आहे. याबाबत शिक्षक चंद्रकांत शिंदे यांच्याविरूध्द कर्जत पोलीस ठाण्यात जखमी रोहनची आई सुनिता जंजीरे यांनी रितसर फिर्याद दिली. दरम्यान, मारहाणीनंतर चंद्रकांत शिंदे हा शिक्षक फरार झाला आहे.