Breaking News

संग्राम जगताप यांना पाठिबा

पाथर्डी (प्रतिनिधी), दि. 11, एप्रिल - पाथर्डी येथील राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांच्यावर राजकीय द्वेषातुन दाखल झालेल्या गुन्हामध्ये आगामी निवडणूका डोळ्यासमोर ठेऊन राजकीय षडयंत्र रचले गेले असुन विनाकारण गुंतवले जात असुन त्यांच्या या घटनेशी कुठलाही संबध नाही तरी योग्य तो तपास होऊन आमदार संग्राम जगताप यांची निर्दोष सुटका करण्यात यावी यासाठी पोलीस स्टेशन आणि तहसिलदार नामदेव पाटील यांना निवेदन देण्यात आले. यावेळी बोलताना शेवगाव पाथर्डी विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष अ‍ॅड. प्रतिक खेडकर यांनी म्हटले की, केडगाव मधील झालेली घटना ही फार दुर्दैवी आहे. राजकीय षडयंत्रातून आमदार अरुणकाका जगताप आणि संग्राम जगताप यांना गुंतवण्यात आले आहे. आम्ही प्रशासनाला निवेदन दिले असुन या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात येऊन या प्रकरणातील मास्टर माइंडचा शोध घेण्यात यावा. तसेच शिवसेना ज्या प्रकारे राजकारण करत आहे ते राजकारणाला न शोभणारे आहे. लवकरच जनेतेसमोर सत्य आल्याशिवाय राहणार नाही. त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अहमदनगर शहराचे तरुण लाडके आमदार संग्राम जगताप यांच्यावर व इतर नेत्यावर राजकीय द्वेषातुन गुन्हा दाखल केलेला आहे. आगामी निवडणूका डोळ्यांसमोर ठेवून राजकीय षडयंत्र रचण्यात आलेले आहे. केडगावची घटना दुर्देवी असुन संबधीत आरोपीने गुन्हा मान्य केलेला आहे. तरी सदरील गुन्ह्यात आमदार संग्राम जगताप यांना विनाकारण गुंतविलेले असुन ते तरुण आमदार आहेत. तसेच त्याचे काम उल्लेखनीय असल्यामुळे राजकीय प्रवास संपविण्याच्या दुष्ट हेतूने त्यांना विनाकारण अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत. तरी या गुन्हातील सर्व बाबींचा योग्य तो तपास होऊन राजकीय द्वेषाने बेकायदेशीर कारवाई करण्यात येऊ नये अशा आशयाचे निवेदन देण्यात आले. यावेळी सिताराम बोरुडे, चांद मनियार, प्रतीक खेडकर, अजित चौनापुरे, बाळासाहेब दराडे, चाँद मनियार, योगेश रासने ,चंद्रकांत मरकड, योगेश वाळके, अमोलराज शेळके पाटील, पप्पू शेळके, सोमनाथ पवार, विशाल ससे, कानिफ मरकड, छत्रपती मरकड, चैतन्य मेहेर, शाहरुख बागवान, विशाल गोसावी, स्वप्नील काकडे, आकाश ढाकणे, आकाश वारे, प्रसाद सबलस, ईश्‍वर गायकवाड, पप्पू सर आंधळे आदी सर्वपक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते.