रेल्वे दुर्घटनेत महाराष्ट्रीयन महिलेचा मृत्यू.
मध्य प्रदेशच्या मोरेना रेल्वे स्थानकावर धावती रेल्वे पकडण्याच्या नादात पाय घसरून रेल्वेखाली पडल्याने ४५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी संपर्क क्रांती एक्स्प्रेसने १५० भाविक हरिद्वारकडे जात असताना दुपारच्या सुमारास घडली. महाराष्ट्रातील देवठान भागातील तारामती नावाची महिला भाविक पाणी घेण्यासाठी स्थानकावर उतरल्यानंतर ही घटना घडली. यावेळी अचानक सुरू झालेली रेल्वे पकडण्याचा प्रयत्न करत असताना रेल्वेखाली आल्यामुळे पीडित महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती रेल्वे पोलीस ठाण्याचे प्रभारी हरिचरण लाल यांनी दिली.
