पाककडून नियंत्रण रेषेजवळ गोळीबार.
जम्मू : जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यातील नियंत्रण रेषेजवळील सीमा चौक्यांवर गोळीबार करत रविवारी पाकिस्तान लष्कराने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. सुदैवाने यावेळी जीवित हानी झाली नाही. सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास दिगवार सेक्टरमधील सीमा चौक्यांना व गावांना लक्ष्य करण्यासाठी पाक लष्कराने गोळीबार सुरू केला. यावेळी भारतीय लष्कराने प्रत्युत्तरादाखल गोळीबार सुरू केल्यानंतर चकमक उडाली. चालू वर्षात नियंत्रण रेषेजवळ शस्त्रसंधी उल्लंघनाच्या विविध घटनांत सुरक्षा दलाच्या १६ कर्मचाऱ्यांसह ३१ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्याने दिली.
