Breaking News

जामगावमध्ये सप्ताहाचे आयोजन

तालुक्यातील जामगाव येथील बढे महाराज सेवाश्रम संस्थानमध्ये बुधवार दि.11 ते 13 एप्रिलपर्यंत गुरुलिंग जंगम महाराज पुण्यतिथी सप्ताह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. दैठणे गुंजाळ रोडवरील पागिरेवस्ती येथे धार्मिक कार्यक्रम पार पडणार असल्याची माहिती सेवाश्रम संस्थानप्रमुख कोंडिराम महाराज बढे यांनी दिली. कार्यक्रमास खा. दिलीप गांधी, आ. विजय औटी, पं. स. चे सभापती राहुल झावरे, उपसभापती दिपक पवार, जि. प. सदस्य सुप्रिया झावरे, पं. स. सदस्या सुनंदा धुरपते आदींसह हजारो भाविक उपस्थित राहणार आहेत. बुधवार (दि.11) रोजी विणापूजन व ग्रंथपूजन, गुरूवारी सायंकाळी 4 वाजता पालखी मिरवणूक, रात्री किर्तन, दि.13 रोजी दत्तमंदिर जिर्णोध्दार व भूमिपूजन समारंभ होणार आहे. त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. याकार्यक्रमास महाराष्ट्र, कर्नाटक परिसरातील हजारो भाविक जामगावमध्ये दाखल होणार आहेत. कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन कोंंडिराम बढे सेवाश्रम इंचगिरी सांप्रदायाच्यावतीने करण्यात आले आहे.