Breaking News

आज संयुक्त टंचाई आढावा बैठकीचे आयोजन

तालुक्यातील आगामी पाणी टंचाई व मजुरांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी ना. राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली कर्जत तालुक्यातील अधिकारी व पदाधिकारी यांची संयुक्त टंचाई आढावा बैठक आज पं. स. सभागृहात होणार आहे. या बैठकीत तालुक्यातील पिण्याचे पाणी टंचाई, रोजगार हमी कामाबाबतची माहिती व कृषी विभागाकडील शेती व जलयुक्त शिवार कामाचा आढावा तसेच तालुक्यातील टंचाईचे पुढील नियोजन करणे, तसेच मागेल त्याला काम उपलब्ध करून देण्यासाठीच्या उपाययोजना करणे. या बैठकीस तालुक्यातील सर्व शासकीय विभागासह ग्रामसेवकासह सरपंच व लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार असल्याची माहिती पं. स. सभापती पुष्पा शेळके यांनी दिली.