Breaking News

ग्रामविकास संघटनेच्या बक्षिसांचे कर्जत येथे वितरण

तालुक्यातील कुळधरण ग्रामविकास संघटनेच्या वतीने शिवजयंतीनिमित्त आयोजित विविध स्पर्धातील यशस्वी विद्यार्थ्यांना कर्जतच्या महात्मा गांधी विद्यालयात बक्षिसांचे वितरण करण्यात आले. कर्जत तालुका ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष व लोकमंथनचे तालुका प्रतिनिधी सुभाष माळवे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम झाला.
कुळधरण ग्रामविकास संघटनेच्या वतीने शिवजयंतीनिमित्त तालुकास्तरीय वक्तृत्व, चित्र रंगवा, विविध गुणदर्शन आदी स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत महात्मा गांधी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.वक्तृत्व स्पर्धेत 11 वीच्या धिरज खेडकर या विद्यार्थ्याने तृतीय क्रमांक पटकावला. त्यास 1 हजार रुपये रोख, प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देवून बहिरोबावाडीचे सरपंच विजय तोरडमल व सुभाष माळवे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. चित्र रंगविणे स्पर्धेत इयत्ता 6 वीतील सौरभ संतोष मेहेत्रे याने प्रथम क्रमांक मिळविला. त्यास 1हजार रुपये रोख, प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देवून सन्मानित करण्यात आले.