मनोरा आमदार निवास घोटाळ्याचा दावा ठरला खरा
मुंबई/विशेष प्रतिनिधी - बातमीचा मागोवा घेत असतांना मुंबई सार्वजनिक बांधकाम विभागातील घडामोडींचा आढावा घेत असतांना शहर इलाखा सार्वजनिक बांधकाम विभागातील मनोरा आमदार निवास इमारतीतील कक्षांच्या कामातील गैरव्यवहार सापडला.या गैरव्यवहाराचा आढावा घेण्याच्या उद्देशाने माहीती मिळवण्याचा प्रयत्न केला असता घोटाळ्याचे घबाड हाती लागले.आ.चरणभाऊ वाघमारे यांची जबाबदार लोकप्रतिनिधीची भुमिका सोबत होती.गेल्या सहा महिन्यांपासून शहर इलाखा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तत्कालीन कार्यकारी अभियंता आणि सहअभियंत्यांनी मनोरातील आमदार कक्षात थाटलेला भ्रष्टाचाराच्या प्रपंचाचा पंचनामा केला.कुठे कशी खेळी केली? कामे न करताच बोगस देयके कुणी कशी कुणाला दिली? याविषयी लेखमाला सुरू ठेवली.या लेखमालेतून लोकमंथनने घेतलेला घोटाळ्याचा कानोसा योग्य असल्याचे मुंबई सार्वजनिक बांधकाम दक्षता पथकाचे अधिक्षक अभियंता धनंजय चामलवार यांच्या चौकशी अहवालातून सिध्द झाले.lead
मनोरा आमदार निवासात लोकप्रतिनिधींच्या कक्षात झालेली कामे बोगस आहेत.काही ठिकाणी कामे न करताच देयके अदा झाली आहेत.तर काही आमदार कक्षांत कामा करण्यास मंजूरी नसतांना दुसर्या कक्षाचा निधी अनाधिकाराने वापरून काम करण्याचे धाडस दाखवले.या आणि तत्सम लक्षणांवरून मनोरा आमदार निवासात शहर इलाखाच्या कार्यकारी अभियंता आणि सहअभियंता कंपनीच्या भ्रष्टाचारी पाळेमुळे रूजल्याची खाञी झाली.लोकमंथनने वृत्तमालिकेच्या पातळीवर तर आ.चरणभाऊ वाघमारे यांनी सभागृहात जबाबदार लोकप्रतिनीधीची भुमिकापार पाडून हे प्रकरण धसास लावले.नागपूरचे हिवाळी अधिवेशन आणि मुंबईचे अर्थसंकल्पीय अधिवेशन या दोन्ही वेळी सभागृहात लोकमंथन आणि आ.वाघमारे यांनी प्रकाशझोतात आणलेल्या या भ्रष्टाचाराची चर्चा झडली.अगदी सुरूवातीलाच या प्रकरणावर प्रसिध्द झालेल्या लोकमंथनच्या वृत्तमालिकेमुळे मुंबई साबांचे अधिक्षक अभियंता यांनी केलेल्या चौकशीत दोषी आढळलेल्या दोन सहअभियंत्यांना तात्काळ निलंबीत करून कार्यकारी अभियंत्यावर केवळ बदलीची कारवाई झाली.यावर आक्षेप नोंदवल्यानंतर पुन्हा चर्चा सुरू झाली.दरम्यानच्या काळात मुंबई साबां दक्षता पथकाचे अधिक्षक अभियंता धनंजय चामलवार यांची चौकशी सुरू होती.आ.चरणभाऊ वाघमारे यांनी नोःदवले आक्षेप आणि लोकमंथनने व्यक्त केलेला कयास आणि भाकीत यापेक्षा वेगळा निष्कर्ष धनंजय चामवलार यांच्या अहवालात निघाला नाही.यावरून अगदी सुरूवातीपासून लोकमंथनने घेतलेला कानोसा तंतोतंत खरा ठरला.