Breaking News

‘पेट्रोलियम पदार्थ जीएसटीच्या कक्षेत हवे’


नवी दिल्ली - केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पेट्रोलियम पदार्थ वस्तू आणि सेवा कराच्या (जीएसटी) कक्षेत आणायला हवे, असे मत मांडले आहे. रविवारी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीने गेल्या चार वर्षांतील उच्चांक गाठला. त्यापार्श्‍वभूमीवर प्रधान यांनी केलेले विधान महत्वाचे मानले जाते. पेट्रोल, डिझेल यांच्या किमती आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील व्यवहारावरून ठरतात. त्यामुळे दरात होणारे चढउतार स्वीकारावे लागतात. जागतिक स्तरावर कच्चा तेलाच्या किमतीत वाढ झाली आहे. त्याची झळ देशातील नागरिकांना बसू नये, यासाठी सरकारने गेल्या वर्षी अबकारी करात कपात केल्याची माहिती प्रधान यांनी दिली.