चेन्नई : चेन्नईच्या ग्रेटर सीटी पोलीस स्थानकात विरोधी पक्षनेते आणि द्रमुक पक्षाचे अध्यक्ष एम. के स्टॅलिन यांच्या घरी बॉम्ब ठेवल्याची धमकी देणारा फोन अज्ञात व्यक्तीकडून आला. त्यानंतर अलवारपेटच्या त्यांच्या निवासस्थळी बॉम्ब शोधक तज्ज्ञ आणि पोलीस कर्मचार्यांनी कसून तपासणी केली. त्यांचे वडील व तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम. करुणानिधी यांच्या गोपालपूरम निवासस्थानीदेखील पोलिसांनी शोध मोहीम राबविली. दोन्ही ठिकाणी कुठल्याही प्रकारचे स्फोटक नसल्याचे शोधमोहिमेदरम्यान समोर आले असले, तरी दोन्ही ठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आली आहे. पुढील तपासणीनंतर आलेला फोन शेजारील कांचीपुरम जिल्ह्यातून केला गेला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. कॉल करणार्या व्यक्तीचा पोलीस कसून शोध घेत आहेत.
स्टॅलिन यांच्या घराभोवतील सुरक्षेत वाढ
Reviewed by Dainik Lokmanthan
on
09:15
Rating: 5