Breaking News

लोणी हवेली मध्ये पाझर तलाव दुरूस्ती कामाचा शुभारंभ

पारनेर तालुक्यातील लोणी हवेली (शंभुदरा) येथे जि.प. अहमदनगर लघु पाटबंधारे विभागामार्फत येथिल पाझर तलाव दुरुस्ती कामाचा उद्घाटन समारंभ जिल्हा परिषदेचे मा. उपाध्यक्ष सुजित झावरे यांचे हस्ते मंगळवारी सांयकाळी 5 वाजता संपन्न झाला.

शंभुदरा तलाव 1972 च्या दुष्काळातील, मात्र 50 वर्षांमध्ये एकदाही त्याची दुरुस्ती झाली नाही. बर्‍याचदा त्याची दुरुस्तीची मागणी करूनही ती झाली नाही. परंतू गावचे सरपंच डॉ.शंकर कोल्हे, उपसरपंच संजय कोल्हे, सोसायटीचे चेअरमन कोल्हे बाबुजी, लोणी हवेलीचे राष्ट्रवादीचे नेते व सामाजिक कार्यकर्ते बाजीराव दुधाडे, शरद कोल्हे, पोपट कोल्हे, किसन नवघणे, यांनी वेळोवेळी सुजीत झावरे याचेंकडे पाठपुरावा केल्यामुळे झावरे यांनी जिल्हा परिषद मधून प्रस्ताव मंजूर करून कामास सुरुवात झाली.
तलावातील पाणी गळती अधिक प्रमाणात असल्याने तलावातील पाणी अवघ्या काहीच दिवसांत संपुष्टात येत असे, त्यामुळे तलावाच्या खाली ज्या शेतकर्‍यांच्या जमीनी आहेत. त्या उपळत आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होत होते. आता मात्र दुरुस्ती नंतर तलावात पाणी अधिक प्रमाणामध्ये जास्त दिवस टिकून राहिल. त्याचा उपयोग शेतकर्‍यांना होईल. शंभुदरा तलावाची दुरुस्ती झाल्यावर बेंदातील तलावाची दुरुस्ती व शिल्लक राहिलेला लोणी ते घाटावरील रस्ता दुरुस्ती पुर्ण करून देण्यात येईल, असेही झावरे यांनी सांगितले.
यावेळी शेतकर्‍यांनी त्यांना येणार्‍या अडचणी सांगितल्या. शक्य त्या अडचणींवर तात्काळ तोडगा काढण्यात आला. 
कार्यक्रमासाठी लोणी हवेलीचे सरपंच डॉ. शंकर कोल्हे, उपसरपंच संजय कोल्हे, सोसायटीचे चेअरमन कृष्णाजी कोल्हे, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष मोहन रोकडे, बाबुराव साठे, अभिमान कोल्हे, भाऊसाहेब जगताप, परशुराम कोल्हे, शिवाजी कोल्हे, गणपत कोल्हे, मा. ग्रामपंचायत सदस्य शंकर कोल्हे, बाजीराव दुधाडे, किसन नवघणे, शरद कोल्हे, गोरख कोल्हे, जयसिंग कोल्हे, अमीत दुधाडे, बाळासाहेब दुधाडे, विजय दुधाडे, सागर हिंगडे, पोपट कोल्हे, भास्कर कोल्हे, दौलत कोल्हे, आप्पा दुधाडे, शरद जगताप, ज्ञानदेव दुधाडे, राजेंद्र दुधाडे, दादाभाऊ कोल्हे, कॉन्ट्रॅक्टर नागेश रोहकले, इंजि. उदमले रावसाहेब, रामसिंग रावसाहेब यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.