Breaking News

तरुणांनी थोरा मोठ्यांचे विचार कृतीत आणावेत : देवकर


अहमदनगर प्रतिनिधी  - महापुरुषांचे फोटो डोक्यावर घेऊन नाचण्याऐवजी त्यांचे विचार डोक्यात घ्यावेत. इतिहासातील थोर नेत्यांचे विचार डोक्यात साठवून आजच्या तरुणांनी थोरामोठ्यांचे विचार कृतीत आणावेत, असे प्रतिपादन अखिल भारतीय प्रदेश कुंभार महासंघाचे अध्यक्ष पंढरीनाथ देवकर यांनी केले. 

बुलडाण्यातील देऊळगाव माळी येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संत गोरोबा काका आणि महात्मा फुले या महामानवांना कुंभार समाजबांधवांच्यावतीने अभिवादन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, माणसापेक्षा पुस्तकाला आणि भाकरीपेक्षा स्वाभिमानाला महत्व देणाऱ्या महामानवांना खरोखर अभिवादन करायचे असेल तर या सर्वांचे विचार प्रत्यक्ष कृतीत आणण्याची नितांत आवश्यकता आहे. यावेळी माळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष नारायण बळी, विश्वशांती बुद्धविहाराचे ज्येष्ठ कार्यकर्ते भास्कर गवई, लहुजी शक्ती सेनेचे तालुकाध्यक्ष संदीप बोरकर, कुंभार समाजाचे युवा अध्यक्ष कैलास राऊत, चर्मकार महासंघाचे प्रल्हाद भारुडकर, जय मल्हार सेनेचे अर्जुन चाळगे, कैकाडी महासंघाचे अनिल गायकवाड, सावता माळी मित्रमंडळाचे पवन गाभणे, स्वप्नील गाभणे, उपरपंच विनोद फलके, यशवंत बनचरे, किसन बळी, विजय सुरुसे आदी उपस्थित होते.